Breaking News

दिलासा! फलटण तालुक्यात 55 कोरोना बाधित ; बधितांच्या तफावतीमुळे नागरिकांचा मात्र गोंधळ

55 corona affected in Phaltan taluka ; However, due to the difference in the number of victims, the citizens are confused

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 29 मे 2021 - फलटण तालुक्याची कालची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 55 असल्याचे फलटण प्रशासनाकडून समजले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग काळात थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र त्याच वेळी जिल्हा प्रशासनाकडून मिळालेली आकडेवारी चिंता करायला लावणारी आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली फलटण तालुक्यातील  कोरोना बधितांची संख्या 955 आहे.  या तफावतीमुळे नागरिकांचा मात्र गोंधळ उडाला आहे. तरी प्रशासनाने नागरिकांचा हा गोंधळ दूर करावा. 

    फलटण तालुका प्रशासनाकडे मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 55 बाधित आहेत.  यामध्ये फलटण शहर 4, खामगाव 2, कूरवली बु 1, मठाचीवाडी 1, मुरूम 1, पिंप्रद 4,  शिंदेवाडी 2, निंबळक 7, होळ 2, पवारवाडी 2, फडतरवाडी 4, राजाळे 2, साखरवाडी 2, सांगवी ता बारामती 1, सासवड 1, दालवडी 2, अलगुडेवाडी 1, गोखळी 1, ढवळेवाडी 1, खडकी 1, कोळकी 1, हिंगणगाव 2, निरगुडी 1, गिरवी 1, सांगवी 1, वर्ये तालुका सातारा 1, वाखरी 2, चौधरवाडी 1, तावडी 1, आंधळी ता. माण 1, आळजापूर 1.

2257 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 24 बाधितांचा मृत्यू

 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2257 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 24 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 58   (7372), कराड 213 (21922), खंडाळा 82 (10194), खटाव 247 (15322), कोरेगांव 126 (13913),माण 75 (10987), महाबळेश्वर 4 (3969), पाटण 90 (6592), फलटण 955(25266), सातारा 317 (34716), वाई 71 (11427) व इतर 19 (1032) असे आज अखेर एकूण 162712 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (164), कराड 5 (631), खंडाळा 0 (131), खटाव 3 (407), कोरेगांव 2 (311), माण 2 (207), महाबळेश्वर 0(43), पाटण 1  (157), फलटण 1 (246), सातारा 9 (1019), वाई 1 (300) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3616 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments