ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021 - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी जाहीर केले. 2019 साठीचा पुरस्कार दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात येणार आहे. 3 मे रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबरोबर हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
नवी दिल्ली येथे या पुरस्काराची घोषणा करताना जावडेकर म्हणाले की ज्यूरी सदस्यांनी ही निवड एकमताने केली होती, जी सरकारने मान्य केली. ज्युरींमध्ये खालील पाच सदस्यांचा समावेश होता.
आशा भोसले
मोहनलाल
विश्वजित चॅटर्जी
शंकर महादेवन
सुभाष घई
रजनीकांत यांच्या कर्तृत्वाविषयी बोलताना जावडेकर म्हणाले की, ते पन्नास वर्षांहून अधिक काळ भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे प्रमुख अभिनेते आहेत. फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी या महान अभिनेत्याचे अभिनंदन केले.

No comments