मास्क न वापरणाऱ्या 51 जणांवर तर सोशल डिस्टनसिंग प्रकरणी 3 दुकानांवर पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - मास्कचा वापर न करता बाजारपेठेत फिरणाऱ्या तसेच दुकानांमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या दुकांदारांवर फलटण शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. काल दि 3 एप्रिल रोजी फलटण शहरात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 51 जणांवर तर सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या 3 दुकानांवर दंडात्मक कारवाई करून 13 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान सर्व नागरिकांनी कोरोना रोगाचे पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याचे वतीने करण्यात आले आहे.
फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचे वाढत असले प्रादुभ्रावाचे अनुषंगाने काल दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख चौकातून तसेच बाजारपेठ मध्ये विदाऊट मास्क फिरत असलेल्या 51 नागरिक/दुकानदार यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सदर वेळी त्यांच्याकडून 10200/- रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.तसेच 3 दुकानात सोशल डिस्टनसींगचे पालन नसलेने त्यांचेकडून 3000 /- रुपये दंड वसूल करण्यात आला.
No comments