डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
गोखळी ( प्रतिनिधी) - १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोहत्सव साजरा होत आहे.परंतु कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे गतवर्षाप्रमाणे याही वर्षी आंबेडकर जयंती ही विचारांची जयंती आणि प्रबोधनातून मानवंदना असा कार्यक्रम निश्चित करून काव्यफुले समूहातर्फे पुरोगामी आणि आंबेडकरी विचारांची काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती काव्यफुले समूहाचे अध्यक्ष सुहास सानप यांनी दिली.
या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून पुढील विषयावर कविता मागवण्यात येत आहेत. १.लोकशाहीच योगदान २. पुस्तकप्रेमी डॉ.आंबेडकर ३. उध्दारली कोटी कुळे ४.मानाचं पान संविधान या विषयावर येणाऱ्या कवितांना रोख पारितोषिक सन्मानपत्र भेट दिले जाणार आहे.प्रथम क्रमांकासाठी १००१/- द्वितीय क्रमांकासाठी ७०१/- आणि तृतीय क्रमांकासाठी ५०१/- रूपये असे स्वरूप आहे .सविस्तर माहितीसाठी सुहास सानप ८५२१४३४३७२ प्रमोद जगताप ८५५४८५७२५२ या नंबरवर स्पर्धकांनी संपर्क साधावा.
No comments