Breaking News

नगरसेवक अजय माळवे व क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप

 मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करताना नगरसेवक अजय माळवे क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे प्रकाश इनामदार , लक्ष्मणराव उदगट्टी

Distribution of masks and sanitizers on behalf of corporator Ajay Malve and Krantisurya Pratishthan

    फलटण ( प्रतिनिधी ) - फलटण मध्ये  कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेवक अजय माळवे यांंनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान च्या सहकार्याने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले.  

  कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक अजय माळवे यांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान च्या सहकार्याने नागरिकांना N95 मास्क आणि सॅनिटायझर च्या बॉटल चे वाटप केले. यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान चे संचालक प्रकाश इनामदार , लक्ष्मणराव उदगट्टी , प्रकाश तेली, तात्या तेली, सुनिल बिडवे , विठ्ठल राऊत , संजय राऊत , श्याम परदेशी आदी उपस्थित होते .

No comments