Breaking News

विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम‌्’ने सुरुवात

विधानभवनात अभिभाषणासाठी दाखल झालेल्या राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांचे स्वागत करताना विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर,   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मान्यवर

The work of the Legislative Council began with 'Vande Mataram'

        मुंबई, दि. १ : विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला वंदे मातरम‌्ने सुरुवात झाली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती

         अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री गोपीकिसन बाजोरिया, सतीश चव्हाण, अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती केली.

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

         विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्य अभिजित वंजारी यांचा परिचय संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहाला करून दिला. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

        विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे माजी दिवंगत सदस्य माधव गोविंद वैद्य व अनंत वामन तरे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला व श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.

No comments