जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी उद्या वेबिनारचे आयोजन
A webinar will be organized tomorrow to guide the process of online validation of caste validity certificate
मुंबई, दि. 24 : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावरुन ऑनलाइन वेबिनारचे उद्या (गुरुवार दि. 25 फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.
सन 2020-21या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक व इतर कारणाकरिता वैधता प्रमाणपत्रासंदर्भांत अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज दि. 01 ऑगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत आहेत, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील (Payment Gateway द्वारे) उपलब्ध करण्यात आलेली आहे.
बरेच अर्जदार अद्याप ही वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत.अर्जदारांना अर्ज भरताना पुढील प्रमाणे अडचणी येतात उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा व कोणते दस्त ऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे स्तरावर गुरुवार दि.25 फेब्रुवारी, 2021 रोजी ऑनलाईन वेबिनारचे (Webinar) आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी सदर ऑनलाईन वेबिनारचा(Webinar) लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे धम्मज्योती गजभिये, यांनी केले आहे.
No comments