Breaking News

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह

Water Resources Minister Jayant Patil's Covid test positive

        गंधवार्ता वृत्तसेवा दि 18 फेब्रुवारी 2021 -  राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे, संपर्कात आलेल्या आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी घ्यावी असे आवाहनही ना. जयंत पाटील यांनी केले आहे.

        आपली कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आल्याबाबत स्वतः जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. 

No comments