महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने शिवजयंतीनिमित्त ‘शिवरायांचे संघटन कौशल्य’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान
नवी दिल्ली, दि. 18 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासक तथा वक्ते गणेश आष्टेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जनतेचा राजा, स्वराज्य निर्माता तथा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने ‘शिवरायांचे संघटन कौशल्य’ विषयावर डोंबिवली (ठाणे) येथील शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासक तथा वक्ते गणेश आष्टेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.
सकाळी 9 वाजता समाजमाध्यमांवरुन व्याख्यानाचे प्रसारण
शुक्रवार, 19 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 9 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल व फेसबुकहून व्याख्यान थेट प्रसारित होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मीडिया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून पाहता येणार आहे.
No comments