Breaking News

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना करोना

State Health Minister Rajesh Tope's corona test positive

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 19 फेब्रुवारी -  कोरना रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच,  आज  राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.  कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याबाबत स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियावर जाहीर केले असून, सध्या माझी प्रकृती चांगली असून कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

        राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल दिनांक 18 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री उशिरा आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याबाबत ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

No comments