Breaking News

शिंदेनगर, आसू येथे रस्ता अडवून दोघांना मारहाण

They blocked the road at Shindenagar Asu and beat them up

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - शिंदेनगर आसू ता. फलटण पंदारकी नावाच्या शिवारात तोडलेला ऊस आणण्यासाठी बैलगाडया व ट्रॅक्ट्रर घेऊन निघाले असताना, दोघांनी त्या अडवून,  तुम्ही या रोडने वाहने घेऊन जायाची नाहीत, हा रस्ता आमचा आहे.असे म्हणुन शिवीगाळी दमदाटी करत दोघांना मारहाण केली असल्याचा गुन्हा फलटण ग्रामिण पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार, शिंदेनगर आसू ता. फलटण गावच्या हद्दीत पंदरकी नावाच्या शिवारात जमीन गट नंबर 88 मध्ये तोडलेला ऊस आणण्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजता बैलगाडया व ट्रॅक्ट्रर घेऊन अमोल शिवाजी रणवरे वय ४० वर्षे रा.शिंदेनगर आसू ता.फलटण हे निघालेले असताना, त्यांचे राहते घराचे जवळच त्यांचे भावकीतील राजेंद्र हणमंत रणवरे व विठ्ठल हणमंत रणवरे दोन्ही रा.शिंदेनगर आसू ता. फलटण यांनी फिर्यादीच्या बैलगाडया व ट्रॅक्ट्रर अडवून फिर्यादी अमोल शिवाजी रणवरे यांना, तुम्ही या रोडने वाहने घेऊन जायाची नाहीत, हा रस्ता आमचा आहे. असे म्हणुन शिवीगाळी दमदाटी करुन, जमिनीवर ढकलून देवून, विठ्ठल हणमंत रणवरे याने डोक्यात दगड मारुन व राजेंद्र हणमंत रणवरे याने त्याचे हातातील काठी फिर्यादीचे उजव्या पायाचे गुडघ्यावर मारुन जखमी केले आहे व फिर्यादीचा भाऊ संतोष शिवाजी रणवरे हा सोडविण्यासाठी आला असता, राजेंद्र रणवरे याने भावाचे उजव्या हाताच्या अंगठयावर चावला  असल्याची तक्रार अमोल शिवाजी रणवरे यांनी दिली आहे.

    गुन्ह्याचा तपास स. फौ.एस.एस.सुर्यवंशी करीत आहेत.

No comments