Breaking News

पीएसएलव्ही-सी 51 / अ‍ॅमेझोनिया -1 मिशनच्या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी एनएसआयएल आणि इस्रोचे अभिनंदन केले

Prime Minister congratulates NSIL and ISRO on the success of the 1st dedicated commercial launch of PSLV-C51/Amazonia-1 Mission

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएसएलव्ही-सी 51/अ‍ॅमेझोनिया-1 मिशनच्या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल एनएसआयएल आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.

"पीएसएलव्ही-सी51/अ‍ॅमेझोनिया-1 मिशनच्या पहिल्या समर्पित व्यावसायिक प्रक्षेपणाच्या यशाबद्दल एनएसआयएल आणि इस्रो यांचे अभिनंदन. यामुळे देशातील अंतराळ सुधारणांच्या नव्या युगाची सुरुवात झाली झाले. 18 सह-प्रवाश्यांमध्ये चार छोट्या उपग्रहांचा समावेश होता  जे आमच्या तरूणांचा उत्साह आणि नवोन्मेशाचे प्रदर्शन घडवितात,” असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील संदेशात म्हंटले आहे.

पीएसएलव्ही-सी51 द्वारे ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनिया-1 उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनोरो यांचेही अभिनंदन केले.

“पीएसएलव्ही-सी51 द्वारे ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनिया -1 उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनोरो यांचे अभिनंदन. उभय देशातील अंतराळ सहकार्यातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि ब्राझीलच्या वैज्ञानिकांना माझ्या शुभेच्छा,” असे पंतप्रधानांनी ट्विटर वरील दुसऱ्या संदेशात म्हटले आहे.

No comments