बिबी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. प्रिती काशिद व उपसरपंच पदी सचिन बोबडे
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बिबी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. प्रिती निलेश काशिद व उपसरपंच पदी श्री. सचिन अशोकराव बोबडे यांची बिनविरोध निवड झाली करण्यात आली आहे.
सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर होताच सदस्य व कार्यकर्त्यांनी गुलाल उडवून आनंद व्यक्त केला. तसेच नूतन सरपंच व उपसरपंच यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. सोशलमीडिया वरही अभिनंदन होत आहे.
No comments