Breaking News

फलटणच्या तहसील कार्यालायतुन चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 1 फेब्रुवारी 2021 - फलटण तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेतून दि. 29 ते 30 जानेवारी 2021 च्या दरम्यान कॉम्प्युटर्स, लॅपटॉप व प्रिंटर्स, राउटर अशा एकूण 2 लाख रुपये किंमतीच्या वस्तूंची चोरी झाली होती. फलटण शहर पोलिसांनी या कामी त्वरित तपास करत,  गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी १,३५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, तहसिल कार्यालय फलटण येथील कार्यालयमधील संगणक, प्रिंटर, सीपीयु , लॅपटॉप, व इतर कार्यालयीन इलेक्ट्रानिक साहीत्य चोरीस गेल्या बाबत श्री. रमेश चिंतामणी पाटील नायब तहसिलदार फलटण यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन फलटण शहर पोलीस ठाणे येथे दि. ३०/०१/२०२१ रोजी दाखल करण्यात आला होता.

        सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना, फलटण शहर पोलीस ठाणे कडील संबधीत तपास पथक यांना   माहीती मिळाली की, नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा फलटण येथिल बंद जिनिंग मध्ये ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहीती प्रमाणे, पोलीस पथक पंच व फिर्यादी यांचे समक्ष सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता, सदरच्या ठिकाणी गुन्हयातील चोरीस गेलेल्या माला पैकी १,३५,०००/- रुपये किंमतीचा मॉनीटर, संगणक, सी.पी.यु, हे प्लॅस्टिक पोत्यामध्ये मिळुन आले असुन, सदरचा मुद्देमाल गुन्हयाच्या तपास कामी, जप्त करण्यात आला आहे. सदर गून्हयाचा तपास श्री. एन.आर गायकवाड सहा पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करत आहेत. सदरची कारवाई श्री.अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा ,श्री धीरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्री तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. भारत किंद्रे, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी श्री नवनाथ गायकवाड सहा.पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, शिवाजी भोईटे, सहा. पोलीस फौजदार, पो.ना. अशोक वाडकर, पो.ना. नितीन भोसले, पो.हवा. विद्याधर ठाकुर , पो.हवा. गार्डी, पो.ना. नितीन चतुरे, पो.ना. विक्रांत लांवड, पो.ना. सर्जेराव सुळ, पो.शि. अच्युत जगताप, पो.कॉ. दिग्विजय सांडगे, पो.कॉ. सुजित मेंगावडे, पो.ना.संदीप मदने यांनी सदरची कारवाई केली आहे.

No comments