Breaking News

पिंप्रद खून प्रकरण - कुटुंबीयांनीच खून करून मृतदेह जाळला

Pimprad murder case - The family members killed and cremated the body

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - पिंप्रद तालुका फलटण येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी माहुली उर्फ मौली झबझब पवार या महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा ने सदर घटनेचा पर्दाफाश केला असून सदरचा खून हा जमिनीच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृताच्या कुटुंबीयांनीच धारदार शास्त्राने खून करून वृद्धेचा मृतदेह जाळला असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अत्यंत्य शिताफीने व कौशल्यापूर्ण तपास करून क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघड करून गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. 

        दि.१०/०२/२०२१ रोजी मौजे पिंपरद, ता.फलटण, जि.सातारा गावचे 'हद्दीत महारकी नावचे शिवारातील जमिन गट नंबर- ३ मधील वादग्रस्त जमिनीमध्ये फिर्यादी कल्पना अशोक पवार रा.अलगुडेवाडी, ता.फलटन हिने झोपडी/पाल टाकले याचा राग मनात धरुन १) कुंडलिक कृष्णा भगत २) सतिश उत्तम भगत ३) राजु प्रल्हाद मोरे ४) कुमार मच्छिंद्र मोरे ५) सुनिल मोरे सर्व रा. पिंपरद, ता. फलटन यांनी आपसात संगणमत करुन फिर्यादीने सदर जमिन वहिवाटु नये म्हणुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादी व त्यांचे कुटुंबातील लोकांना जखमी केले व झोपडी पेटवुन देवुन झोपडीमध्ये झोपलेली फिर्यादीची नणंद माहुली उर्फ मौली झबझब पवार हिचा खुन केला वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ६१/२०२१ भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, ४३६ अ.जा.ज.का.क. ३(१)(आर) ३(२) व्ही.ए. अन्वये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

            सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांचेसह गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाच्या परिस्थीतीवरुन फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांनी सदर गुन्हयाचा बनाव केला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांना त्या अनुषंगाने तपास करुन गुन्हयाची सत्यता पडताळण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे अधिपत्याखाली विशेष पथकाची नेमणुक करण्यात आली.

        सदर पथकाने गुन्हयाचा समांतर तपास करताना फिर्यादीमध्ये नमुद आरोपी, त्यांचे घरातील लोक, घटना ठिकाणच्या आजुबाजुच्या परिसरातील तसेच गावातील रहिवासी, फिर्यादी व त्यांचे घरातील इतर साक्षीदार यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा फिर्यादीत नमुद आरोपी यांनी केला नसल्याचे निदर्शनास आले. सदर घटनाठिकाणच्या वादग्रस्त जमीनीच्या वहीवाटीबाबत फिर्यादी व आरोपी यांचेमध्ये वाद होता, त्या वादातुन खोटया गुन्हयात अडकवण्याच्या उददेशाने फिर्यादी व तिच्या घरातील लोकांनी सदर गुन्हयाचा बनाव केला असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे गुन्हयातील संशयीत यांचे हालचालीबाबत माहिती घेतली असता फिर्यादीचे २ मुले हे गुन्हा घडलेपासुन परागंदा असुन ते पोलीसांसमोर येत नव्हते. त्यांचा गुन्यातील सहभाग पाहता त्यांना सर्वप्रथम ताब्यात घेवुन विचारपुस करणे आवश्यक असल्याने अलगुडेवाडी व परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला असता ते त्यांचे राहते घरी न राहता गावाच्या आजुबाजुला असलेल्या उसाच्या शेतात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे सपोनि गर्जे यांचे अधिपत्याखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ते ज्या परिसरातील ऊसाच्या शेतात लपुन राहिलेले आहेत त्याबाबत माहिती प्राप्त करुन त्या उसाच्या शेताचे परिसरात सापळा लावून सतत २ दिवस थांबुन राहिले असता दि.१२/०२/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाजण्याचे सुमारास सदर संशयीत इसमापैकी एक जण शेजारील ऊसाचे शेतातुन बाहेर आला. सापळा पथकातील पोलीसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीसांची चाहुल लागताच तो ऊसाचे पिकाचा आधार घेवून पळाला. त्याचा तपास पथकामधील पोलीसांनी ऊसाचे शेतामधून, रानावनातून पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर नमुद संशईत इसमाचा भाऊ देखील त्याच परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा दोन ते तीन तास परिसरामध्ये शोध घेवून त्यास मांगोबा माळ नावचे परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले, नमुद दोन्ही संशईत इसमांकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. परंतू त्याचेकडे Interrogation Skill चा वापर करुन कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी गुन्हयातील फिर्यादी, तिचे घरातील तसेच जवळच्या नात्यातील लोकांनी दि.१०/०२/२०२१ रोजी सायंकाळी १९.३० वा.चे.सुमारास मयत माहूली मौली झबझब पवार हिचे पाठीमध्ये धारदार शस्त्राने वार करुन तिच्या डोक्यामध्ये दगड टाकून तिला जिवे ठार मारले व त्यानंतर तिचे अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देवून तिचा खुन केला. त्यानंतर भांडी, तांदुळ व इतर साहित्य विस्कटून स्वत:चे अंगावर जखमा करुन घेवुन गुन्हयाचा खोटा बनाव केला असल्याचे सांगीतले. नमुद गुन्हयाचा तपास श्री. तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपयिभाग हे करीत असून गुन्हयाचे तपासामध्ये आत्तापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

        गुन्हयातील आरोपी यांच्यावर यापुर्वी खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जबरीचोरी, गर्दी मारामारी, दुखापत या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

        श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे सुचना प्रमाणे व श्री.किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री.रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, स.फौ.उत्तम दबडे, ज्योतिराम बर्गे, तानाजी माने, पो.हवा.अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, रवि वाघमारे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ.विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, संकेत निकम, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रविण अहिरे, महेश पवार, अनिकेत जाधव, चा. पो.ना.संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, विजय सावंत, यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

        फिर्यादी व साक्षिदार यांनी खुना सारख्या गंभीर गुन्हयाचा खोटा बनाव केला असताना सलग ३ दिवस अहोरात्र परिश्रम घेवून आरोपींचे वास्तव्य असलेल्या परिसरातील रानावनात, ऊसाचे शेतात थांबून राहून, गुन्हयातील संशईतांना शिताफिने ताब्यात घेवून, त्यांच्याकडे Interrogation Skill चा वापर करुन कौशल्यपुर्वक तपास करुन, गुन्हयाचे सत्य बाहेर काढून क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघड केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

No comments