Breaking News

कोरोना वाढल्यामुळे राष्ट्रवादीचा जनता दरबार स्थगित

NCP's Janata Darbar postponed due to Corona's rise

        गंधवार्ता वृत्तसेवा, दि. 19 फेब्रुवारी 2021 - राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात येणारा जनता दरबार पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत  ट्विटर वर  माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार जनता दरबार दोन  आठवड्यांसाठी स्थगित करण्यात येत असल्याचे ट्विटरवर सांगण्यात आले आहे.

        राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंट वरून विहित करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील दोन आठवडे जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्यात येत आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. 

        तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आणि गर्दी टाळावी.

        जनतेची व कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या काही समस्या अथवा प्रश्न असतील तर याबाबतचे संपूर्ण निवेदन संबंधीत मा. मंत्री / राज्यमंत्री यांच्या नावाने ncpjantadarbar@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. हे निवेदन संबंधीत मंत्री महोदयांना पुढील कार्यवाहीसाठी पोहचविण्यात येईल.

No comments