Breaking News

फलटण येथील रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा लोकार्पण व कलशारोहन सोहळा

Dedication and Kalasharohan Ceremony of the Ravivar Peth Talim Ganpati Temple in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ - रविवार पेठ तालीम गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त 22 ते 24 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

    कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 22 रोजी सकाळी 11 ते 2 श्री ची मूर्ती व कलश आगमन आगमनाने झाली. सायंकाळी श्रींच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. रात्री दशविध स्नान व ध्यानाधिवास विधी पार पडले.

     गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी १२ ते १. ३० या वेळेत विरशैव महिला भजनी मंडळ यांचे भजन होणार असून, दुपारी 4 वाजता संकल्प पुण्याहवाचन श्री व कलश यांना जलाभिषेक जलदिवास, उदक शांती मुख्य देवता स्थापन पूजन. रात्री 9 ते 11 या वेळेत माणकेश्वर भजनी मंडळ यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे.

     शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी 10 वाजता मंदिर वास्तुशांती व श्रींच्या मूर्तीवरील संस्कार हवन पुर्णआहुती. दुपारी 4 वाजता मूर्ती व कलश प्रतिष्ठापना सायंकाळी 5 वाजता श्रींची महाआरती सायंकाळी 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

    मंदिराचा लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार असून, कलशारोहण सुंदरगिरी महाराज (सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव) व संभाजी भिडेगुरुजी (शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर भूषविणार आहेत.

    यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम,पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, के बी उद्योग समूहाचे चेअरमन सचिन यादव, नगरसेवक पंकज पवार,नगरसेविका सौ कविता मदने हे प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित राहणार आहेत.

     या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रविवार पेठ तालीम गणपती मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले, उपाध्यक्ष किरण शहाणे, मार्गदर्शक मोहनराव पोतेकर यांनी केले आहे सदरचा समारंभ रविवार पेठ येथील गोविंद प्लाझा समोर होत आहे.

No comments