Breaking News

मास्क वापरा; दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा दंडात्मक कारवाई - फलटण पोलीस

Use masks otherwise punitive action - Phaltan Police

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 19 फेब्रुवारी 2021 -  सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी तसेच दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंगसह मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा  अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत देण्यात आला आहे. आज फलटण शहरामध्ये पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी लाऊडस्पीकर च्या साह्याने कोरोना संसर्गात  मास्क वापरणे व सोशल डिस्टनसिंग बाबत जाहीर आवाहन करण्यात आले.

        फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा तसेच सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. फलटण शहरातील सर्व दुकानदार - व्यापारी यांनी आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवावे, जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या  नियमांचे पालन करावे, जे दुकानदार नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत, त्या दुकानांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा फलटण शहर पोलीस स्टेशन कडून देण्यात आला आहे.

No comments