Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

Greetings in the Vidhan Bhavan on the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj

        मुंबई, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, डॉ. नीलम गोऱ्हे, श्री.नरहरी झिरवाळ

        सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्यांच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपारिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळ्याचे आकर्षण ठरले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, विशेष कार्य अधिकारी अनिल महाजन, सभापती, विधानपरिषद यांचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव रविंद्र जगदाळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, म.वि.स. (अतिरिक्त कार्यभार) निलेश मदाने व महाराष्ट्र विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

No comments