Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे 01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द !

Minister Shambhuraj Desai on the background of Corona, All scheduled meetings till March 01, event canceled!

जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

           सातारा दि. 22 (जिमाका) :  राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक,मोर्चे,यात्रांवर शासनाने बंदी घातली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत.  गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार  गृहविभागामार्फत देण्यात आलेल्या  सर्व नियमांचे पालन करुन घेणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी दिली.

             राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री   उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक,धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून यातून लॉकडाऊन टाळण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचे पालन राज्यातील जनतेने काटेकोरपणे करावे व शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना टाळावा असे आवाहनही  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी केले.

No comments