Breaking News

वैशाली शिंदे यांची रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सल्लागार समितीवर निवड

Vaishali Shinde selected to Railway Advisory Committee of Railway Ministry

        गंधवार्ता वृत्तसेवा फलटण 22 फेब्रुवारी 2021- आयडियल इंटरनॅशनल स्कूल च्या संस्थापक अध्यक्षा सौ. वैशाली शिंदे यांची रेल्वे मंत्रालयाच्या, रेल्वे सल्लागार समितीवर  निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल वैशाली शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     सौ. वैशाली शिंदे यांची भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सल्लागार समितीवर  निवड झाली असून, त्यांचे कार्यक्षेत्र हे भारतीय मध्य रेल्वे असणार आहे. मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश चा काही भागाचा समावेश आहे . सदरील निवड भारत सरकार चे रेल्वे मंत्री  पियुष गोयल साहेब यांच्या आदेशाने झालेली आहे. 

    सल्लागार समितीवर  निवड झाल्यांनातर वैशाली शिंदे यांचे प्रत्यक्ष भेटीद्वारे तसेच दूरध्वनीद्वारे मान्यवरांनी अभिनंदन केले. सोशल मीडियावरीही शुभेच्छा व अभिनंदन होत आहे. 

        सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिला आज 4 राज्यात रेल्वे विभागात सल्लागार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, मंत्री प्रकाश जावडेकर, सातार चे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय सचिव विनो तावडे व पंकजाताई मुंडे आदी सर्व वरिष्ठ मान्यवरांचे सौ. वैशाली शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

No comments