Breaking News

ना. छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

Minister Chhagan Bhujbal's corona test positive

गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि 22 फेब्रुवारी 2021 -

         राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबाबत स्वतः छगन भुजबळ यांनी सोशल मीडिया द्वारे जाहीर केले असून, सध्या माझी प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा, असे आवाहन ना. छगन भुजबळ यांनी केले आहे

        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करा.

No comments