Breaking News

कालवा आवर्तनामध्ये अडथळा आणल्यामुळे जलसंपदा विभागाकडून फौजदारी गुन्हा दाखल

Criminal case filed by Water Resources Department for obstruction of canal rotation

     सातारा दि. 5 (जिमाका) : सध्या रब्बी हंगामाकरीता भोर व खंडाळा तालुक्यासाठी धोम बलकवडी कालव्याचे सिंचन आवर्तन चालू आहे. या आवर्तनादरम्यान दि. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी मौ. कन्हेरी ता. खंडाळा येथे काही लोक पाण्यामध्ये उतरुन बेकायदेशीरपणे कालव्यामध्ये बांध टाकून परस्पर  पाणी वळवित असल्याचे जलसंपदा विभागाच्या पाहणी पथकास आढळून आले. या पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित लोकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालुन बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला. त्या मुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित लोकांविरुध्द अनधिकृतसित्या  कालव्याचे पाणी वळविल्याबाबत व शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे, असे कार्यकारी अभियंता सातारा सिंचन विभाग सातारा यांनी कळविले आहे.

  धोम बलकवडी काव्याच्या लाभधारकांनी  आपली पाणीपट्टी थकबाकी शासनाकडे जमा करुन रीतसर पाणी मागणी अर्ज देऊन पाणी घ्यावे असे आवाहनही कार्यकारी अभियंता सातारा सिंचन विभाग यांनी केले आहे.

No comments