Breaking News

कोविड-१९ ज्या काळात प्रशासनाबरोबर जनतेचे सहकार्यही महत्त्वाचे - मुख्याधिकारी प्रसाद काटकर

Covid-19 At a time when the co-operation of the people with the administration is also important - Prasad Katkar

        फलटण (प्रतिनिधी) - संपूर्ण जग कोरोना महामारी चा सामना करत असताना सर्वच पातळ्यांवर संघर्षातून निर्माणाची भूमिका घ्यावी लागत आहे.यामध्ये डॉक्टर्स,नर्सेस,आशा वर्कर्स, पोलिस प्रशासन व प्रशासकीय यंत्रणेबरोबर जनतेचं  सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले.

        मुख्याधिकारी प्रसाद काटकर कमला निंबकर बालभवन फलटण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत होते.या वेळी विद्यार्थ्यांना 'वसुंधरा वाचवा' ही शपथही देण्यात आली.यात पर्यावरण दक्षता बरोबर पर्यावरणाचे संवर्धन व वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

       विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी, कोविड  परिस्थितीत फलटणमधील स्थिती हाताळताना, प्रशासकीय पातळीवर नवनवीन योजना व त्यासंदर्भातली उपाययोजना यावर त्यांनी प्रकाश टाकून शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कोविडच्या पीक कालावधीमध्ये अनेक समस्यांवर केलेल्या उपाययोजना व त्यादरम्यान आलेल्या अडचणी व त्यावर केलेल्या मात याविषयी त्यांनी आपली भूमिका मांडली. अत्यंत नियोजनबद्ध व सूक्ष्म नियोजनामध्ये आशा वर्कर्स पासून ते  जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. यामध्ये सामान्य नागरिकांनी दिलेल्या सहकार्य याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनाही त्यांनी धन्यवाद दिले.त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सध्या स्थितीमध्ये फलटण याठिकाणी लसीकरण मोहीम कशा पध्दतीने राबविली जात आहे याची माहिती दिली. 

        यावेळी प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबकर यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या व वैद्यकीय सेवा सुविधांच्या  सक्षमीकरण विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काटकर म्हणाले,"कोविड - १९ या पार्श्वभूमीवर काम करताना वैद्यकीय सेवा सुविधांच्या कमतरतेची जाणीव झाली. फलटण तालुक्यांमध्ये पाच ते सहा लाख लोकसंख्या असल्याने प्रशासन  देत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे या काळात शासनाच्यावतीने मदत झाली.अतिरिक्त कर्मचारी, डॉक्टर्स नर्सेस व आशा वर्कर्स त्याचबरोबर वैद्यकीय यंत्रणा, साधनसामुग्री पुरविण्यात आली.

        या वेळी झूमद्वारे या सत्रासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनीही आपले प्रश्न विचारले.त्यांच्या प्रश्नांचीही काटकर यांनी उत्तरे दिली.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमिनाथ घोरपडे यांनी केले. तसेच वसुंधरा संवर्धनाची शपथ व आभार संज्योत उंडे यांनी केले.

         या वेळी प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ मंजिरी निंबकर, कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, शिक्षण समन्वयक उपशिक्षिका मधुरा राजवंशी, शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे व सुवर्णा कुलकर्णी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments