Breaking News

चैन स्नॅचर पासून सावधान! फलटण पोलिसांचा इशारा!

Beware of chain snatchers!

        गंधवार्ता वृत्तसेवा,फलटण - शहरातील संजीवराजे नगर, लक्ष्मीनगर, गिरवीनाका रोड,जाधववाडी रोड, विमानतळ परीसरात अज्ञात चोरटे मोटार सायकल वरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने, हातातील मोबाईल, पर्स हिसकावून घेऊन जात असून फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, असे कोणी संशयित दिसल्यास तात्काळ फलटण शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन हे करण्यात आले आहे.

        फलटण शहर पोलीस ठाणे तर्फे फलटण शहरातील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, फलटण शहरातील संजीवराजे नगर,लक्ष्मीनगर,गिरवीनाका रोड,जाधववाडी रोड व परीसर विमानतळ परीसर या ठिकाणी अज्ञात चोरटा मोटर सायकलवरुन पाठिमागुन येवुन विषेशता महिलांचा पाठलाग करुन गाडीला लावलेली पर्स,अथवा पायी चालनारे महिलेच्या हातातील मोबाईल, गळयातील मंगळसुत्र इत्यादी चोरुन पलायन करीत आहे. याबाबत सर्व महिलांनी सुरक्षितेच्या दृष्टीने सतर्क राहुन आपले मोबाईल व पर्स गाडीवरुन प्रवास करीत असतांना तसेच पायी चालत असतांना खबरदारी घ्यावी. असा एखादा संशयीत इसम निदर्शनास आल्यास तात्काळ फलटण शहर पोलीस ठाणेस

संपर्क करावा. असे फलटण शहर पोलीस ठाणे मार्फत आवाहन करण्यात येत आहे. 

संपर्क क्रमांक - शहर पोलीस स्टेशन - 02166222333

पोलीस निरीक्षक किंद्रे साहेब - 9923040893

No comments