फलटण आगारातर्फे अष्टविनायक दर्शन यात्रा
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.)फलटण आगारा तर्फे श्री गणेश भक्ताच्यां सोयी साठी खास अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करण्यात आली असून जास्तीत जास्त गणेश भक्तांनी अष्टविनायक यात्रा बसचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक ,फलटण यांनी केले आहे.
फलटण येथून मोरगाव- सिध्दटेक- थेऊर- रांजणगाव- ओझर- लेण्याद्री- महड- पाली येथून परत मोरगाव - फलटण असा प्रवासाचा मार्ग आहे . प्रवासाचा खर्च प्रती माणसी १२००/- रुपये आहे. अष्टविनायक यातर श्री गणेश जयंती दिवशी सोमवार दि.१५/२/२०२१ रोजी निश्चीत करण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान एक मुक्काम राहील. ईच्छुक गणेश भक्तांनी स्थानक प्रमुख तसेच आरक्षण कक्ष ,फलटण आगार याच्यांशी संपर्क साधावा व आपले तिकीट आरक्षीत करावे .
No comments