नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी पुढील पाच वर्षांकरिता 50,000 कोटी रुपये
देशातील संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये देशातील नावीन्य आणि संशोधन व विकास यांना चालना देण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात डिजिटल पेमेंट्स, अंतराळ क्षेत्र आणि खोल महासागरीय शोधांचा समावेश असलेल्या उपक्रमांची तरतूद करण्यात आली आहे.
नॅशनल रिसर्च फाउंडेशन
नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी पुढील पाच वर्षांकरिता 50,000 कोटी रुपये, खर्चाचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी सादर केला. यामुळे संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांवर भर देता येईल, असे त्या म्हणाल्या.
डिजिटल पेमेंट्स ना चालना
डिजिटल पद्धतींच्या पेमेंट्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देणाऱ्या योजनेसाठी 1,500 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय भाषांच्या भाषांतराची मोहीम (एनटीएलएम)
या अर्थसंकल्पात राष्ट्रीय भाषांच्या भाषांतराची मोहीम प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित एनटीएलएम इंटरनेटवर प्रशासन आणि धोरण संबंधित ज्ञानाची संपत्ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करेल आणि प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होईल.
खोल महासागरी मोहीम
महासागरात खोलवर उत्खननासाठी आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पुढील पाच वर्षांसाठी 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने खोल महासागरी मोहिम प्रस्तावित करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
No comments