मयुर दादासाहेब रणवरे यांची सीमा शुल्क अधिकारी पदी निवड
दुधेबावी (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिंती ता. फलटण येथील मयुर दादासाहेब रणवरे यांची सीमा शुल्क अधिकारी ( वर्ग १ ) पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मयूर रणवरे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा जिंती ता.फलटण येथे झाले.माध्यमिक शिक्षण साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथे झाले.उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट अॉफ सायन्स सातारा येथे झाले असून महाविद्यालयीन शिक्षण कॉलेज अॉफ इंजिनिअरिंग पुणे येथे झाले आहे. ते बँक अॉफ महाराष्ट्र सातारा शाखेमध्ये उपप्रबंधक म्हणून कार्यरत होते. धनगरवाडी ता.फलटण येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब रणवरे व झिरपवाडी ता.फलटण येथील उपशिक्षिका उर्मिला रणवरे यांचे ते चिरंजीव आहेत. मयुर रणवरे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले.


No comments