Breaking News

कोळकी ग्रामपंचायतीमध्ये राजे गटाची सरशी; काही ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कोळकी ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची उत्सुकता राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांना लागली होती. कोळकी ग्रामपंचायती मध्ये पुन्हा एकदा राजे गटाची सत्ता स्थापन होणार असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलला अपयशाला सामोरे जावे लागले आहे. श्रीराम पॅनल चार एकही उमेदवार विजय होऊ शकला नाही तर काही ठिकाणी राजे गटातील बंडखोर उमेदवार व एक अपक्ष उमेदवार विजयी झाल्याचे चित्र दिसत आहे.

राजे गटाचे प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार तुषार नाईक-निंबाळकर यांचा मात्र आश्चर्यकारकरित्या पराभव झाला आहे. भाजपचे कामगार नेते बाळासाहेब काशीद यांच्या पत्नी सौ. सुनीता बाळासाहेब काशीद यांचाही पराभव झाला.

निवडणूक निकाल

प्रभाग क्रमांक 1

1) अक्षय शामराव गायकवाड (राजे गट बंडखोर उमेदवार) 

2) निर्मला यशवंत जाधव (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 2 

1) सोनाली विजय जठार (राजे गट अधिकृत उमेदवार)

2)  रमेश चंद्रकांत नाळे (राजे गट बंडखोर उमेदवार)

3) स्वप्ना अनिल कोरडे (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 3

1) सौ.रेश्मा संजय देशमुख (राजे गट अधिकृत उमेदवार) 

2) सौ.रुपाली सागर चव्हाण (राजे गट अधिकृत उमेदवार) 

3) संजय बबन कामठे (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 4

1) गणेश दिनकर शिंदे (राजे गट अधिकृत उमेदवार)

 2) सौ.वर्षा ज्ञानदेव शिंदे (राजे गट अधिकृत उमेदवार) 

 3) सौ.प्राजक्ता सागर काकडे (राजे गट अधिकृत उमेदवार) आणि सौ.मयुरी राजीव खिलारे (राजे गट बंडखोर उमेदवार) यांच्यात टाय झाली होती. यामध्ये चिट्ठीद्वारे सौ. प्राजक्ता सागर काकडे यांचा विजय झाला.

प्रभाग क्रमांक 5 

1) विकास अशोक नाळे (राजे गट अधिकृत उमेदवार) 

2) सौ.विजया संदीप नाळे (राजे गट अधिकृत उमेदवार)

3) डॉ.अशोक गेनबा नाळे (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 6

1) सौ.राधिका अशोक पखाले (राजे गट अधिकृत उमेदवार)

2) सौ.लक्ष्मी रणजितसिंह निंबाळकर (राजे गट बंडखोर

उमेदवार) 

 3) शिवाजी मारुती भुजबळ (अपक्ष)

No comments