राजाळे येथे अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न
![]() |
शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डॉ. स्वाती गुरवे शेजारी सचिन जाधव |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राजाळे ता. फलटण - कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण प्रक्षेत्र भेट व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
कृषि विज्ञान केंद्र बोरगाव ता. सातारा विषय विशेषतज्ञ पीकसंरक्षण डॉ. स्वाती गुरवे यांनी, यावेळी मका पिकांवरील अमेरीकन लष्करी अळी चे जीवनक्रम बाबत तसेच अमेरिकन लष्करी अळी चे एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीने नियंत्रण करणे आवश्यक असल्याचे तसेच, पक्षी थांबे , फिरोमन सापळे, व सापळा पिकाचा वापर करणे यात एरंडी पिकाचा मका पिकांच्या प्लॉटच्या कडेने लागवड केल्यास, अळीचे तीव्रता वरून अळीचे नियंत्रण करणे शक्य असल्याचे तसेच अमेरिकन लष्करी अळीचे सुरवातीला प्रादुर्भाव आढळून आल्यास जैविक उपाययोजना व अमेरिकन लष्करीअळी चे जास्त तीव्रता आढळून आल्यास यावेळी रासायनिक उपाययोजना करणे बाबत सविस्तरपणे माहीती डॉ स्वाती गुरवे यांनी दिली.
शेतकऱयांनी अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण बाबत व त्याच्याशी निगडित विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ स्वाती गुरवे यांनी दिली. क्रॉपसेप सर्वेक्षण अंतर्गत निवडण्यात आलेल्या मोबाईल सर्वेक्षण मका पीक फिक्स प्लॉट शेतकऱ्यांच्या मका पीक प्लॉट भेट यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन श्री सचिन जाधव कृषि सहायक राजाळे यांनी केले. तर निलेश भिले यांनी आभार मानले.
यावेळी श्री माणिक निंबाळकर, अनंत ताटे, संतोष फाळके, विजय अनपट, शिवाजी बनकर, विकास मांढरे, आप्पसो गाढवे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर दशरथ तांबाळे , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गुरूदत्त काळे , उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्कर कोळेकर, तालुका कृषि अधिकारी फलटण सुहास रणसिंग, मंडळ कृषी अधिकारी बरड भरत रणवरे, कृषि पर्यवेक्षक मल्हारी नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकन लष्करी अळी व हुमणी कीड नियंत्रण काम सध्या सुरू आहे.
No comments