Breaking News

महाराष्ट्र पर्यटनावर आधारित ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’

‘Maha Videography Contest’ on Maharashtra Tourism 

        मुंबई - : पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे आणि देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात येण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या स्पर्धेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच छंदप्रेमी, हौशी, व्यावसायिक व्हिडिओग्राफर्स यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.

        राज्यातील किल्ले, लेणी, वन्यजीव, समुद्रकिनारे, मुख्य धार्मिक स्थळे, वारसास्थळे आणि महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण बाबी यापैकी कोणत्याही विषयावर प्रवेशिका आधारित असणे आवश्यक आहे. निवडलेले व्हिडिओज महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेतस्थळावर व सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील. पर्यटन संचालनालयाच्या वतीने निवडलेल्या सहभागींना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात येतील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तसेच स्पर्धेच्या अटी जाणून घेण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी, http://www.maharashtratourism.gov.in असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments