सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष यांची शानभाग विद्यालय सदिच्छा भेट
सातारा - सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे प्रणेते ता.का. सूर्यवंशी, जे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित झालेले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आहेत तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी मंडळाचे प्रणेते आहेत. या सूर्यवंशी सर यांनी नुकतीच के .एस. डी .शानभाग विद्यालयात सदिच्छा भेट दिली.
विद्यालयाच्या संचालिका सौ . आचल घोरपडे यांनी सूर्यवंशी सरांचा श्रीफळ सन्मानपत्र व ड्रायफ्रूट्स देऊन सत्कार केला. त्यांच्यासमवेत माध्यमिक विभागाच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .रेखा गायकवाड प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी हिंदी विषयाचे शिक्षक मोहन यादव उपस्थित होते .
सूर्यवंशी सर यांनी यावेळी शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
No comments