विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई येथे
मंत्रिमंडळ निर्णय : दि. २ डिसेंबर २०२० - कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विधानमंडळाचे आगामी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे आयोजित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
हे अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे घेण्यात येणार होते.
No comments