Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा श्रीमंत विश्वजीतराजे यांचा निर्णय

 Vishwajitraje decides not to celebrate his birthday on the backdrop of Corona

        फलटण दि. 22 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, आपण आहात तेथूनच, मला शुभेच्छा व आशिर्वाद द्यावेत, आपण सर्वजणांनी कोरोनापासुन काळजी घ्यावी, हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल असे आवाहन केले आहे.

        आज आपल्या महाराष्ट्र राज्यावर नव्हे तर संपूर्ण देश व जगावर कोरोनाचे संकट आहे. गेले ७ ते ८ महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटा विरुध्द लढा देत आहोत आणि लढा देत असताना आपले सर्वांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे.

        बुधवार दि.२३ डिसेंबर रोजी माझा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशिर्वाद व शुभेच्छा द्याव्यात. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करुया. आपण सर्वजण कोरोनापासुन काळजी घ्या, हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल. आपले प्रेम आणि आशिर्वाद माझ्यासोबत आहेतच असे आवाहन श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांनी केले आहे.

No comments