Breaking News

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश ; नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात

Urmila Matondkar started a new political career by joining Shiv Sena today

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. १ डिसेंबर २०२० -  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला.  सौ. रश्मी ठाकरे यांनी उर्मिलाच्या हाती शिवबंधन बांधले. याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपस्थितीमध्ये उर्मिला मातोंडकर यांना शिवबंधन बांधताना सौ. रश्मी ठाकरे

      उर्मिला मातोंडकर यांनी आज  शिवसेनेत प्रवेश करून एक नव्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. शिवबंधन बांधल्यानंतर उर्मिलाने पत्रकार परिषद घेऊन आपल्या आपल्या पक्षप्रवेश व राजकीय वाटचालीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. 

        सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर  उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिने उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत तिला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सहकार्य न करण्याचा आरोप करत ऊर्मिला काँग्रेसमधून बाहेर पडली. आता अभिनेत्री उर्मिला पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आहेत.

No comments