Breaking News

सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ; जिल्ह्यामध्ये "येलो लाईन कॅम्पियन" सुरु

Tobacco control programs in schools in Satara district

         सातारा  -: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविला जातो. यावर्षी विशेषतः देण्यात आलेले उद्दिष्ट येलो लाईन कॅम्पियन" शालेय स्तरावर सातारा जिल्ह्यातील ७५ शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. विद्यालयीन व महाविद्यालयीन मुले व तरुण पिढी तंबाखू व तत्सम पदार्थांकडे आकर्षित न होता; त्यापासून परावृत्त व्हावेत व शाळेच्या १०० यार्ड परिसरातील तंबाखू विक्री करणारी दुकाने उठवण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या सहाय्याने हटवण्यात यावीत हेच या कॅम्पियनचे उद्दिष्ट आहे.

       जिल्हाधिकारी, शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण व नोडल ऑफिसर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविला जातो.

        कोटपा २००३ कायद्यामधील कलम ६ अ अंतर्गत अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे व कलम ६ ब शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजण्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. हे दोन्ही कलम शालेय स्तरावर लागू होतात. या कायद्याचे उल्लंघन केल्यास रु.२०० पर्यंत दंड आकारण्यात येतो. यावर्षी नव्याने आखलेल्या येलो लाईन कॅम्पियन मध्ये पिवळ्या रंगाची शाळेच्या १०० यार्ड परीसारवर “तंबाखू सेवन,विक्री आणि खरेदी प्रतिबंधित क्षेत्र तसेच “तंबाखू मुक्त शाळा असे Oil based रंगाने (शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार) स्पष्ट लिहिण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या आवारात ६० x ४५ सेमीचा तंबाखू मुक्त परिसर असा मराठी फलक लावण्यात आलेला असावा.

      जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने येलो लाईन कॅम्पियन चे व पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग अश्या विविध स्तरावर तंबाखू व तत्सम पदार्थांचे  आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कोट्पा २००३ कायदा व तंबाखू मुक्तीसाठी समुपदेशन याबातीत प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे.तरी लवकरात लवकर जिल्ह्यातील ७५ शाळा येलो लाईन कॅम्पियन अंतर्गत तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत.यामध्ये श्रीमती .दिपाली इंगवले (समुपदेशक - एनटीसीपी), श्रीमती. इला ओतारी (सोशल वर्कर- एनटीसीपी ) व .सुरज कवारे (दंत सहाय्यक - एनओएचपी) यांचे मोलाचे सहकार्य आहे.

No comments