Breaking News

श्री दत्त इंडिया साखरवाडी कारखान्याकडून एफ. आर. पी. प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

         फलटण -:  श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी, ता. फलटण या साखर कारखान्याचे सन २०२०-२०२१ च्या दुसऱ्या गळीत हंगामातील गाळप दिमाखात सुरु असून कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ऊसाचे एफ. आर. पी. प्रमाणे होणारे १० कोटीहुन अधिक ऊस पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने प्रसिद्धीस दिली आहे.

        साखरवाडी कारखाना यावर्षीच्या हंगामात दि. १ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून कारखान्याने आज अखेर ९० हजार ८३३ मे. टन ऊसाचे गाळप करुन ९३ हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन केले आहे, सरासरी साखर उतारा १०.७५% मिळाला आहे.

            दि. १ ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यात ३८ हजार ६९१ मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून या ऊसाला एफ. आर. पी. प्रमाणे प्रति टन २५७९ रुपये देणे अपेक्षीत आहे, मात्र प्रत्यक्षात प्रति टन २५९२ रुपये प्रमाणे १० कोटी २ लाख ८६ हजार ७६७ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

No comments