Breaking News

बेरोजगार उमेदवारांसाठी 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organizing online job fairs for unemployed candidates on 12th and 13th December

        सातारा -: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने 12 व 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

        या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.  मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोन द्वारे घेण्यात येणार आहेत.

        काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत तळ मजला एस.टी स्टॅन्ड जवळ, सातारा येथे किंवा कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी कळविले आहे.

No comments