Breaking News

MDH मसाल्याचे सर्वेसर्वा धर्मपाल गुलाटी यांचे निधन

MDH Masala Sarvesarva Dharmapal Gulati passes away

        (गंधवार्ता वृत्तसेवा) - मसाला कंपनी महाशिय दी हट्टी (MDH)चे सर्वेसर्वा महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज  निधन झाले. सकाळी 5.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 3 आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाऱ्याच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

        धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी पाकिस्तानच्या सियालकोट येथे झाला होता. धर्मपाल यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी पाकिस्तानच्या सियालकोट येथे झाला होता. त्यांचे कुटुंब 1947 मध्ये फाळणीवेळी पाकिस्तानातून अमृतसर आणि नंतर दिल्लीत आले होते. धर्मपाल यांचे वडील महाशय चुन्नीलाल गुलाटी यांनी MDH (महाशय दी हट्टी)ची सुरुवात केली होती. धर्मपाल यांनी व्यवसाय वाढवला आणि MDH ला प्रसिद्ध ब्रँड बनवले. कंपनीच्या जाहीरातींमध्येही ते स्वतः दिसत होते. उद्योगातील योगदानाबद्दल महाशय धर्मपाल यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

No comments