वाठार निंबाळकर येथे शेतजमिनीतून अवैध वाळू उपसा
![]() |
वाठार निंबाळकर येथे शेतजमिनीतून अवैध वाळू उपसा |
फलटण दि. 28 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा)- वाठार निंबाळकर परिसरामध्ये वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळूचा उपसा चालू असून, शेतजमिनीतून करण्यात आलेल्या बेसुमार वाळू उपश्यामुळे शेत जमिनीत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यासंदर्भात तेथील ग्रामस्थांनी तक्रारी देखील केल्या आहेत परंतु प्रशासन त्याकडे दूर्लक्ष करीत आहे.
वाळू माफियांनी वाठार निंबाळकर ता.फलटण येथे गट नंबर 148, 149 व 150 या जमिनीतून रात्रीच्या वेळेस जेसीबी च्या साह्याने खोदकाम करून ट्रक, ट्रॅक्टर च्या साह्याने मोठया प्रमाणात वाळू उपसा व वाळू वाहतूक सुरू केली आहे. या वाळू उपश्यामुळे तेथील जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असताना प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वाळू उपशामुळे जमिनीला मोठे खड्डे पडले आहेत व त्यामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे तिथे एखादे पीक घ्यायचे म्हटले तरी घेता येत नाही. ठिकठिकाणी जमीनी आतून पोकळ झालेल्या आहेत, त्यामुळे जमिनीवर वहिवाट देखील करता येत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
No comments