कै. मनोहर आढाव यांच्या कुटुंबियांना राजाळे केंद्रातील शिक्षकांचावतीने आर्थिक मदत
![]() |
कै. मनोहर आढाव यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देताना राजकुमार रणवरे व इतर |
कोळकी (वार्ताहर) - मोहीतेवस्ती (सांगवी) ता. फलटण येथील प्राथमीक शिक्षक कै. मनोहर आढाव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना राजाळे केंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
गटविकास अधिकारी अस्मिता गावडे, गटशिक्षणाधिकारी रमेश गम्बरे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मठपती यांच्या प्रेरणेने व राजाळे केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे यांच्या मार्गदर्शनाने राजाळे केंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे तीस हजार रुपये गोळा करून कै . आढाव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली .यावेळी केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे यांच्या हस्ते, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नितीन बनसोडे,अभिजीत भालेराव ,सखाराम बनकर,नानासो धायगुडे, धनाजी मोरे, आदी शिक्षकांचा उपस्थित मदत देण्यात आली.
No comments