नाताळ सुट्ट्या : मुंबई - पुणे करीत फलटण आगाराकडून जादा बसेस
फलटण दि. 23 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.)फलटण आगारा मार्फत पुणे-मुंबई करिता जादा बसेस वाहतुक नियोजन करण्यात आले आहे, प्रवाश्यांनी याचा लाभ घ्यावा, एस.टी.ने सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन आगार व्यवस्थापक फलटण यांनी केले आहे.
दि.२४/१२/२०२० रोजी पुणे स्टेशन -फलटण २ बसेस व स्वारगेट-फलटण २ बसेस जादा नियोजन केले आहे , तसेच मुंबई परेल वरुन-फलटण करिता रात्री ९.०० व ११.३० वाजता, बोरिवली वरुन-फलटण करीता रात्री ८.००, ११.३० वाजता बसेस सुटणार आहेत.
दि.२७/१२/२०२० रोजी फलटण-स्वारगेट दुपारी ३.१५ व ४.१५ वाजता व फलटण-पुणे स्टेशन दुपारी -३.४५ व ४.४५ वाजता बसेस सुटणार आहेत. तसेच बोरिवली करीता ११.०० व १२.३० वाजता, परेल करिता १.००, व २.३० वाजता जादा बस फलटण वरुन सोडण्यात येईल.
दि.२८/१२/२०२० ला परेल करिता सकाळी ६.०० वाजता बोरिवली करीता सकाळी ५.०० वाजता ,स्वारगेट करिता सकाळी ५.३०,६.१५ वाजता,पुणे स्टेशन करिता सकाळी ५.४५,६.४५ वाजता बस सोडण्यात येणार आहे तरी प्रवाशांनी जादा बसेस चा लाभ घ्यावा व सुरक्षीत प्रवास करावा असे आवाहन आगार व्यवस्थापक फलटण यांनी केले आहे.
No comments