ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल?
ग्रामपंचायात निवडणूक लढविणाऱ्यांसाठी निकष व नियम
सातारा दि.22 -: ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारी अर्ज करण्यास 23 डिसेंबरपासून सुरवात होणार असून, 30 डिसेंबर (दुपारी तीनपर्यंत) ही शेवटची मुदत आहे. मात्र, 25 ते 27 या काळात सार्वजनिक सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवसच मिळणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 25 हजारांची मर्यादा ठरवून दिली आहे. तर 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीतील प्रत्येक सदस्याला निवडणूक कालावधीत 35 हजारांचा खर्च करता येईल, असेही निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहे. 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना 50 हजारांपर्यंत खर्च करता येणार आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील (एससी) उमेदवारास प्रत्येकी शंभर रुपयांचे डिपॉझिट द्यावे लागणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठीही शंभर रुपयेच अनामत रक्कम असून सर्वसाधारण तथा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
No comments