Breaking News

ताथवडा येथे अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ताथवडा ता.फलटण येथील तलावातून वाळू काढून अनाधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर व जेसीबी वर फलटण महसूल पथकाने कारवाई करून सदसरची वाहने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला जमा केली आहेत.

        फलटण महसूल खात्याच्या भरारी पथकास, ताथवडा येथील तलावात अनाधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असलेले  ट्रॅक्टर व JCB आढळून आल्याने सदरची कारवाई करण्यात आली.  

        कारवाई मध्ये स्वतः  श्री शिवाजीराव जगताप, उपविभागीय अधिकारी फलटण  व  श्री समीर यादव तहसीलदार फलटण सहभागी झाले होते  यांचे नेतृत्वाखाली सदर कारवाई रात्रभर निर्जन स्थळावरील  डोंगर कपारी मधून जेसीबी वाहन व ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. सदर कारवाई मध्ये श्री हनुमंत नागरवाड तलाठी सांगवी, श्री किशोर वाघ तलाठी तरडगाव, श्री संदीप हुळहुळे तलाठी आदर्की, श्री लक्ष्मण अहिवळे तलाठी ताथवडा, श्री शीलवंत चव्हाण तलाठी हिंगणगाव, श्री योगेश धेंडे तलाठी फलटण व ड्रायव्हर बाळासाहेब भिसे सहभागी होते. तसेच 

        सदर कारवाई मध्ये श्री एस एन जाधव पोलीस उपनिरीक्षक, एस एस माने, पोलीस कॉन्स्टेबल एस जी चौरे व होमगार्ड सोनवलकर यांनी सहभाग घेतला होता.  दोन्ही वाहने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे या ठिकाणी जमा करण्यात आली आहे. सदर कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाईमध्ये 9 लाखापर्यंत दंड वसूल करणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. 

No comments