Breaking News

6 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 345 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

    सातारा दि. 26  - :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत  6 नागरिकांना  घरी सोडण्यात आले असून 345  जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

345 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 13 , कराड येथे 51 , फलटण येथे 6, कोरेगाव येथे 24, वाई येथे 24, खंडाळा येथे 4, रायगांव येथे 10, पानमळेवाडी येथे 16, महाबळेश्वर येथे 10, दहिवडी येथे 37, म्हसवड येथे 11, तरडगाव येथे 19 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील  120 असे एकूण  345 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

एकूण नमुने -280936
एकूण बाधित -54483  
घरी सोडण्यात आलेले -51533  
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1155

No comments