वाठार निंबाळकर येथे झालेल्या अपघातात युवक ठार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - वाठार निंबाळकर ता. फलटण येथे भरधाव वेगात पुसेगाव कडून येणाऱ्या हुंडाई वेरणा या चार चाकी वाहनाने फलटण कडून येणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीस समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास सागर वसंत गोरे रा. कटगुण, तालुका पुसेगाव जिल्हा सातारा हे त्यांच्या हुंडाई वेरना क्र. एमएच 04 एफ एफ 5696 या चारचाकी वाहनातून भरधाव वेगात पुसेगाव कडून फलटणच्या दिशेला चालले होते. तर फलटण कडून पुसेगावच्या दिशेला ॲक्टिव्हा क्र. एमएच 11 सी पी 1896 दुचाकीवर उदय रमेश शिंदे वय 32 वर्षे राहणार ताथवडा ता. फलटण जिल्हा सातारा हे चालले असताना, मौजे वाठार निंबाळकर ता.फलटण गावचे हदीत एस.टी स्टँड समोर पुसेगाव बाजूकडून येणाऱ्या सागर वसंत गोरे याने त्याच्या ताब्यातील हुंडाई वेरना ही चारचाकी, हयगयीने व अविचाराने चालवून तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीस जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात उदय रमेश शिंदे वय 32 हे गंभीर दुखापत होऊन फार झाले आहेत असल्याची फिर्याद मयत उदय शिंदे यांचे चुलत भाऊ सागर दौलत शिंदे रा. ताथवडा ता. फलटण यांनी दिली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार डी. डी. कदम हे करीत आहेत.


No comments