दिगंबर आगवणे यांच्या आयुर ट्रेडर्स मध्ये 2 लाख 47 हजाराची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दिगंबर आगवणे यांच्या वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्स कंपनीतील हायड्रोलिक मशिन्स व इलेक्ट्रिक मोटर्स असा सुमारे 2 लाख 47 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वाठार निंबाळकर ता.फलटण गावचे हद्दीत दिगंबर आगवणे यांच्या मालकीच्या, आयुर ट्रेडर्स कंपनीतुन, दिनांक २१ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या पूर्वी नक्की तारीख वेळ माहित नाही, कंपनीचे गेट कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी खोलुन कंपनीच्या शेडमधील, १ लाख २५ हजार रुपये किंमतीची (जुनी किंमत) एक निळे रंगाची CGL MAKE कंपनीची हायड्रोलिक मशिन त्यास १५० एच.पी.ची इलेक्ट्रीक मोटार जोडलेली होती. ५०००/- रुपये किंमतीची एकुण २ इलेक्ट्रीक मोटारी रौनक कंपनीच्या निळे रंगाच्या मशिन ९७ हजार रुपये किंमतीची (जुनी किंमत) १ इलेक्ट्रीक मोटार रौनक कंपनीची निळे रंगाची मशिन जोडलेली, २० हजार रुपये किंमतीची (जुनी किंमत) एकुण १२ मशिनचे पॅनलची एमसीबी असा एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याची फिर्याद अविनाश पोपट रिटे वय २६ वर्षे रा.गिरवी ता.फलटण जि.सातारा यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे.
अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एन.जाधव हे करीत आहेत.


No comments