Breaking News

मंदिर, मस्जिद व प्रार्थना स्थळे पाडव्यापासून सुरू

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि.१४ नोव्हेंबर) - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे, मस्जिद व प्रार्थना स्थळे बंद होती. दिवाळी पाडव्यापासून मंदिरे आणि सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे खुली करणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर च्या माध्यमातून केली आहे.

        राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार असून सर्वांनी नियम, शिस्तीचे काटेकोर पालन करावे. प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळून स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करावे. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं'ची इच्छा समजा! असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

No comments