Breaking News

काँग्रेसप्रेमी घराण्यातील महिलेला तालुकाध्यक्षपद बहाल केले असल्याचे समाधान सर्वांना होत आहे - महेंद्र सुर्यवंशी बेडके

        फलटण -: भोंगळे वस्ती- फलटण तालुक्यात महिला वर्गामध्ये काँग्रेस पक्ष वाढावा या उद्देशाने काँग्रेस प्रेमी घरण्यातीलच सौ.सुजाता सुनील गायकवाड यांची तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. त्यांची निवड म्हणजे त्या घराण्याचा योग्य सन्मान केला असून प्रथमपासूनच ज्यांनी काँग्रेस पक्षाची निष्ठा ठेवणाऱ्यां योग्य व्यक्तीला पद दिल्याचे समाधान होत असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे समन्वयक श्री.महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी भोंगळे वस्ती फलटण येथे केले.   

        तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. सुजाता गायकवाड यांची काँग्रेस पार्टी तर्फे निवड केल्याबद्दल भोंगळे वस्ती फलटण येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बेडके बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते श्री.प्रकाशराव भोंगळे होते. प्रास्तविक स्वागत योगेश गायकवाड यांनी केले. सोपानराव जाधव ,पंकज पवार ,नितीन जगताप,प्रकाश भोंगळे,सुजाता ताई गायकवाड, कविता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करून गायकवाड ताईंचा सत्कार केला.           

             या प्रसंगी आप्पासाहेब भोंगळे, चंद्रकांत निंबाळकर ,प्रशांत मदने, विठ्ठल कदम,भिमराव जावळे,प्रमोद अभंग, मधुकर भुजबळ, बळवंत गायकवाड, कुमार भोंगळे, अशोक शिंदे, विवेक जाधव,जयश्री गायकवाड,सुनंदा गायकवाड, आनिता भोंगळे,संगीता भोंगळे,स्वाती भोंगळे,अनिता कुदळे,आरती भुजबळ,मनीषा भुजबळ,सह ईतर महिला वर्ग नवचैतन्य गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments