शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून घरफोडी चोरीचा गुन्हा उघड
सातारा :- शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून, घरफोडीतील चोरलेला मुद्देलमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
शाहूपूरी पोलीस ठाणे गुरनं.४१६/२०२० भादविसंक. ३८० प्रमाणे घरफोर्डी चोरीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.त्यामध्ये अज्ञात आरोपी याने लॉकडाऊनमध्ये फिर्यादी यांचे घरातील ५५ इंची सॅमसंग कंपनीचा स्मार्ट टिव्ही व सीसीटीव्ही कॅमेरे व डिव्हीआर चोरी करुन नेला होता.सदर गुन्हा दाखल झाले नंतर मा.सहा.पोलीस अधीक्षक यांनी स.पो.नि.श्री विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणने बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाचे घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते.त्यानंतर सदर फूटेज मधील कैद झालेल्या इसमांचा शोध घेत असताना, सदरचा इसम हा करंजे परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती.आज रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, सदर फुटेज मधील संशयीत इसम हा भैरवनाथ पटांगण करंजे येथे उभा आहे.त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जावुन सदर इसमांची खात्री करुन त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हया बाबत विचारपुस केली असता, त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यानंतर त्यास पोलीस ठाणेत आणुन त्याचेकडे कौशल्याने तपास करता, त्याने नमुद गुन्हयाची कबुली देवून, सदरचा गुन्हा त्याने व त्याचे साथिदाराने केला असले बाबत सांगितले.त्यानंतर सदर इसमाचे साथिदारास ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला १०,०००/- रुपये किमतीचा ५५ इंची स्मार्ट टिव्ही हस्तगत करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक अमर काशिद हे करीत आहेत.
अशा प्रकारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर गुन्हयाचा सलग तपास करुन सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपी निष्पन्न करुन आरोपींना अटक करुन त्यांचेकडून १०,०००/- रुपये किंमतीचा ५५ ईंची स्मार्ट टिव्ही हस्तगत करुन ४८ तासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई मा.सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.विशाल वायकर सहा. पोलीस निरीक्षक श्री.संदिप शितोळे पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे, स्वप्निल कुंभार, पो.कॉ. ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी केली आहे.
No comments